Nike Layoffs 2024: स्पोर्ट्सवेअर कंपनी नायके 2 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; खर्च कमी करण्यासाठी घेतला निर्णय
या टाळेबंदीमुळे जागतिक स्तरावर कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते.
Nike Layoffs 2024: स्पोर्ट्सवेअर दिग्गज नायकेने जागतिक स्तरावर आपले कर्मचारी कमी करण्याची योजना आखली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, खर्च कमी करण्याच्या हालचालीचा एक भाग म्हणून नायके आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 2 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल. या टाळेबंदीमुळे जागतिक स्तरावर कंपनीच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या 1,600 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, शुक्रवारपासून (16 फेब्रुवारी) कर्मचाऱ्यांची टाळेबंदी सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच दुसरा टप्पा तिमाहीच्या अखेरीस पूर्ण होईल. या कपातीचा परिणाम कंपनीच्या स्टोअर्स आणि वितरण केंद्रांवर किंवा त्याच्या इनोव्हेशन टीममधील कर्मचाऱ्यांवर होणार नाही. लेऑफचा मागोवा घेणारी वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान, जगभरातील 154 तंत्रज्ञान कंपन्यांनी 39,400 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगल विविध विभागातील 500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. याशिवाय Amazon आपल्या आरोग्य आणि गेमिंग विभागातून सुमारे 1,900 नोकऱ्या कमी करत आहे. (हेही वाचा - UPS Layoff: जगातील सर्वात मोठी पार्सल डिलिव्हरी कंपनी युपीएस 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)