Surya Grahan 2023 Date and Timings: यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिलला; जाणून घ्या त्याची वेळ
2023 वर्षातील पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल दिवशी आहे. भारतामधून हे ग्रहण दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही वेध पाळले जाणार नाहीत. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या सामान्य अवकाशीय घटना असल्या तरीही भारतीय समाजात त्याच्याशि निगडीत अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे ग्रहणाच्या काळात विशिष्ट रीती रिवाज पाळले जातात. 20 एप्रिल दिवशी सूर्यग्रहण सकाळी 7.05 च्या सुमारास सुरू होणार असून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असणार आहे. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया मध्ये हे ग्रहण पाहता येईल. नक्की वाचा: ग्रहणात गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी.
पहा ट्वीट
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही. )
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)