UFO किंवा एलियन्स येत आहेत पृथ्वीवर? SpaceX Starlink Satellite Train च्या व्हायरल व्हिडिओमुळे ट्विटर युजर्स हैराण (See Photos)
याआधी हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथेही आकाशात अशीच गोष्ट दिसली दिसली होती.
उत्तर प्रदेशातील मलिहाबाद-माल परिसरात आकाशात एक विचित्र तसेच अद्भुत गोष्ट दिसली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज आकाशात ट्रेनसारखी लांबच्या लांब गोष्ट नजरेस पडली. यामध्ये ट्रेनच्या डब्यांप्रमाणे दिवे जळत होते. सध्या सोशल मीडियावर लोक याचे व्हिडीओ शेअर करत आहेत. ट्रेनसारखी दिसणारी ही तेजस्वी गोष्ट हजारो लोकांनी पाहिली. याआधी हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथेही आकाशात अशीच गोष्ट दिसली दिसली होती. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये जम्मूकाश्मीर येथे भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमा भागात, आकाशात अशीच ट्रेनसारखी वस्तू दिसली होती. त्यावेळी एडीजी मुकेश सिंह यांनी सांगितले की, आकाशात दिसणारा रहस्यमय प्रकाश हा उपग्रहाच्या स्टारलिंक ट्रेनचा प्रकाश होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)