Aditya L1 Mission Sun Photos: आदित्य एल 1 ने टिपले सूर्याचे पहिल्यांदाच Full Disk Images; पहा अद्भूत करणारा नजारा

हा पेलोड नेणाऱ्या दुर्बिणीने 6 डिसेंबर रोजी 11 वेगवेगळ्या फिल्टरसह सूर्याचे फोटो घेतले आहेत.

Sun | Twitter

आदित्य एल 1 ने सूर्याचे पहिल्यांदाच Full Disk Images आपल्या कॅमेर्‍यामध्ये टिपले आहे. इस्त्रो कडून सूर्याचे हे अद्भूत करणारे फोटोज समोर आले आहेत. सन अल्ट्रा वॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप द्वारा सूर्याचे हे फोटो टिपण्यात आले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी, आदित्य L-1 चा SUIT पेलोड लॉन्च करण्यात आला. हा पेलोड नेणाऱ्या दुर्बिणीने 6 डिसेंबर रोजी 11 वेगवेगळ्या फिल्टरसह सूर्याचे फोटो घेतले आहेत. वेधशाळेत आता यावर अभ्यास केला जात आहे. Aditya L1 Mission: आदित्य एल 1 सह असलेल्या कॅमेर्‍याने टिपलेले पृथ्वी आणि चंद्राचे फोटो ISRO ने केले शेअर .

पहा ट्वीट