Reliance Jio ने उभारला Siachen Glacier वर उभारला पहिला 5G Mobile Tower

सियाचीन ग्लेशियर हा जगातील सर्वात उंच युद्धभूमी आहे.

Siachen Glacier (Photo Credits: X/@firefurycorps)

रिलायन्स जिओची 5G कनेक्टिव्हिटी आता जगातील सर्वात उंच युद्धभूमी, सियाचीन ग्लेशियर येथे उभारण्यात आली आहे. पहिल्याच प्रयत्नात, भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने, जिओ टेलिकॉमच्या सहकार्याने, सियाचीन ग्लेशियरवर पहिला 5G मोबाइल टॉवर उभारला आहे. 13 जानेवारी 2025 रोजी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. Fire and Fury Signallers आणि सियाचीन वॉरियर्सने उत्तर ग्लेशियरवर 5G BTS उभा करण्यासाठी कठोर भूभाग आणि -40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानावर मात केली." Jio ने पोस्टद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले, " नेहमी देशाच्या सेवेत."

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now