You Tube CEO : यूट्यूबच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या नील मोहन यांची नियुक्ती
अमेरिकास्थित भारतीय वंशाचे नील मोहन यांची यूट्यूबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
भारतीय वंशाचे नील मोहन (Nil Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube) नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत यूट्यूबची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने घोषणा केली आहे. यूट्यूब हा सर्वाधिक पाहिला जाणारा व्हिडीओ स्ट्रिमींग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान व्होजिकी (Susan Wojcicki) यांनी कौटुंबिक, आरोग्य आणि वैयक्तिक कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी यूट्यूबचा राजीनामा देत असल्याचे सांगितलं. सुसान व्होजिकी हे सीईओच्या पदावरुन पायउतार झाल्यानंतर नील मोहन यांची त्यांची सीईओच्यापदी नियुक्ती झाली आहे.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)