Microsoft Lay Offs: मायक्रोसॉफ्टमध्ये होणार नोकर कपात; ऍक्टिव्हिजन ब्लिझार्डसह गेमिंग विभागातील 1,900 लोकांना कामावरून काढले जाणार

मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड $68 दशलक्ष म्हणजे सुमारे ₹565 कोटींमध्ये विकत घेतले होते. अहवालानुसार, एकूण 22,000 कर्मचारी असलेल्या मायक्रोसॉफ्ट गेमिंग विभागाच्या सुमारे 8% लोकांना कामावरून काढले जाणार

Microsoft (PC- Wikimedia Commons)

Microsoft Lay Offs: या वर्षाच्या सुरुवातीपासून गेमिंग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करत आहेत. आता टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने आपल्या व्हिडिओ गेम विभागातील 1900 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखली आहे. मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, या टाळेबंदीमुळे ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड आणि एक्सबॉक्ससह इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षी ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड $68 दशलक्ष म्हणजे सुमारे ₹565 कोटींमध्ये विकत घेतले होते. अहवालानुसार, एकूण 22,000 कर्मचारी असलेल्या मायक्रोसॉफ्ट गेमिंग विभागाच्या सुमारे 8% लोकांना कामावरून काढले जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, कंपनीचे गेमिंग प्रमुख फिल स्पेन्सर यांनी त्यांना टाळेबंदीबद्दल माहिती देणारा ईमेल पाठवला आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने वॉशिंग्टन राज्यातील बेल्लेव्ह्यू आणि रेडमंड कार्यालयातून 559 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. (हेही वाचा: Google More Layoffs: तंत्रज्ञान कंपन्यांनी एका महिन्यात 7,500 कर्मचाऱ्यांना दिला नारळ; सुंदर पिचाई यांच्याकडून गुगलमध्ये आणखी टाळेबंदीचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now