Meta's Big Action in India: भारतामध्ये मेटाची मोठी कारवाई; नोव्हेंबर 2023 मध्ये Facebook, Instagram वरील 23 दशलक्षाहून अधिक खराब कंटेंट काढून टाकला

यापैकी, कंपनीने वापरकर्त्यांना 4,209 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली.

Instagram, Facebook (PC - Pixabay)

मेटाने (Meta) नोव्हेंबर 2023 मध्ये भारतामध्ये मोठी कारवाई केली आहे. मेटा म्हटले आहे की, नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात फेसबुकच्या 13 पॉलिसींमधील 18.3 दशलक्ष कंटेंट आणि इंस्टाग्रामसाठी 12 पॉलिसींमधील 4.7 दशलक्ष कंटेंटचे तुकडे काढून टाकले. 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान फेसबुकला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 21,149 अहवाल प्राप्त झाले आणि त्यांनी 10,710 प्रकरणांमध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 10,739 अहवालांपैकी जेथे विशेष रिव्ह्यूची आवश्यकता होती, तिथे कंपनीच्या धोरणांनुसार कंटेंट रिव्ह्यू केले गेले आणि एकूण 4,538 अहवालांवर कारवाई केली. उर्वरित 6,201 अहवालांमध्येही रिव्ह्यू झाले परंतु कदाचित कारवाई केली गेली नाही.

दुसरीकडे, इंस्टाग्रामवर, कंपनीला भारतीय तक्रार यंत्रणेद्वारे 11,138 अहवाल प्राप्त झाले. यापैकी, कंपनीने वापरकर्त्यांना 4,209 प्रकरणांमध्ये त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मदत केली. इतर 6,929 अहवालांपैकी जेथे विशेष रिव्ह्यूची आवश्यकता होती, तिथे मेटाने कंटेंट रिव्ह्यू केला आणि एकूण 4,107 अहवालांवर कारवाई केली. उर्वरित 2,822 अहवाल रिव्ह्यू केले गेले, परंतु कदाचित कार्यवाही केली गेली नाही. (हेही वाचा: Instagram New Features: इन्स्टाग्राम युजर्सना मिळणार खास फिचर, स्टोरीवर प्रोफाइल शेअर करण्याचा मिळणार पर्याय)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif