Kaynes Technology Chip Plant: कायन्स टेक्नॉलॉजी 3750 कोटींची गुंतवणूक करून कर्नाटकात उभारणार चिप प्लांट; मिळणार 3200 लोकांना रोजगार

म्हैसूरमध्ये कायन्स सर्किट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एक प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) उत्पादन कारखाना स्थापन केला जाईल.

Job प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कायन्स टेक्नॉलॉजी (Kaynes Technology) आणि कर्नाटक IT-BT विभागाने म्हैसूरमध्ये सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग फॅसिलिटी (OSAT) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. कायन्स टेक्नॉलॉजीने कर्नाटकात तब्बल 3,750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे 3200 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. एका निवेदनात ही माहिती समोर आली आहे.

म्हैसूरमध्ये कायन्स सर्किट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे एक प्रिंटेड सर्किट बोर्ड (पीसीबी) उत्पादन कारखाना स्थापन केला जाईल. या कारखान्यात कॉम्प्लेक्स मल्टी लेयर बोर्ड तयार केले जातील. कायन्सच्या निवेदनानुसार हा करार कर्नाटकला OSAT आणि पीसीबी तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर ठेवेल. या भागीदारीद्वारे चिपची मागणी पूर्ण होईल, असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे कर्नाटक हे अत्याधुनिक सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र बनेल. हा सामंजस्य करार म्हैसूरला जागतिक नकाशावर आणण्यात मदत करेल. (हेही वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या Dearness Allowance मध्ये सप्टेंबरमध्ये वाढ होण्याची शक्यता)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)