क्रिप्टो एक्सचेंजवर मोठी कारवाई, Google ने Play Store वरून Binance, Kraken यासह अनेक परदेशी क्रिप्टो अॅप्स काढून टाकले
वित्त मंत्रालयाचा आरोप आहे की हे क्रिप्टो प्लॅटफॉर्म स्थानिक मनी लाँडरिंग कायद्याचे पालन न करता भारतात बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत.
क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्यांना गुगलने (Google) मोठा धक्का दिला आहे. सरकारच्या सूचनेनंतर गुगलने भारतात कार्यरत विदेशी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजचे मोबाइल अॅप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. यामध्ये Binance, Kucoin, Huobi, Kraken सारख्या अनेक अॅप्सचा समावेश आहे. यापूर्वी, डिसेंबर 2023 च्या अखेरीस, वित्त मंत्रालयाने बिनन्ससह 9 ऑफशोअर व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता सेवा प्रदात्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयालाही त्यांचे URL ब्लॉक करण्यास सांगितले होते. वित्त मंत्रालयाचा आरोप आहे की हे क्रिप्टो प्लॅटफॉर्म स्थानिक मनी लाँडरिंग कायद्याचे पालन न करता भारतात बेकायदेशीरपणे कार्यरत आहेत.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)