Free Online Training on AI: आता भारतीय भाषांमध्ये मोफत मिळणार ऑनलाइन Artificial Intelligence प्रशिक्षण; सरकारने लाँच केला खास कार्यक्रम

विशेषत: ग्रामीण भागात भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे.

Artificial Intelligence (File Image)

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त भारतीय भाषांमध्ये मोफत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण देण्यासाठी एआय फॉर इंडिया 2.0 लाँच केले. हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE), राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य परिषद, आयआयटी मद्रास आणि आयआयएम अहमदाबाद यांनी सुरू केला आहे. एआय प्रशिक्षण कार्यक्रम हा एज्युटेक स्किल इंडिया मिशन अंतर्गत एक संयुक्त उपक्रम आहे.

तंत्रज्ञान शिक्षणातील भाषेचा अडसर दूर करून युवाशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने याची सुरुवात झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने ही चांगली सुरुवात आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, GUVI च्या माध्यमातून भारतीय भाषांमध्येही अभ्यासक्रम तयार केला जाईल. एआय प्रशिक्षण कार्यक्रम 9 भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान शिक्षणातील भाषेतील अडथळे दूर करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. (हेही वाचा: Google Bard New Features: गुगल बार्डमध्ये नवीन फिचर अॅड; आता तुम्ही ऐकू शकता तुमच्या प्रश्नांची उत्तरे)