India Fined Entire WTC Final Match Fees: पराभवानंतर टीम इंडियाला मोठा झटका, ICC ने लावला मॅच फीचा दंड

लंडनमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी टीम इंडियाला संपूर्ण मॅच फीचा दंड ठोठावला आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलियालाही दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने ट्विट करून याबाबत माहिती दिली. लंडनमधील ओव्हल मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाची बॅटिंग लाईन अप फ्लॉप ठरली.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)