Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पैलवान अमन सेहरावतने जिंकले कांस्यपदक, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे.
Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो कुस्ती स्पर्धेत अमन सेहरावत यांनी कांस्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकल्यामुळे भारतीयांची मान उंचावली आहे. अमनच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. 21 वर्षीय पोर्तो रिकोच्या डॅरियन टोई क्रुझला 13-5असा पराभूत करून कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्तीमध्ये देशाला पहिले पदक जिंकून दिले आहे. अमनने वैयक्तिक पदक जिंकून साऱ्या भारतीयांचे मनं जिकंली आहे. सोशल मीडियावर अमन सेहरावतचे कौतुक केले जात आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 मेडल जिंकले आहेत ज्यात, पाच कांस्यपदक आणि एक सिल्वर पदक आहे. (हेही वाचा- पॅरिस गेम्समधील ब्रेकिंग, प्रसारमाध्यमांतील ऑलिम्पिक वार्तांकनावर खास गूगल डूडल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)