Vijay Hazare Trophy 2022: महाराष्ट्राचा पराभव करत सौराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफीच्या जेतेपदावर कोरलं नाव
2008 मध्ये हा संघ शेवटच्या वेळी चॅम्पियन झाला होता.
अहमदाबाद येथे महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यात विजय हजारे ट्रॉफीचा जेतेपदाचा सामना झाला. सौराष्ट्र संघ 14 वर्षांनंतर पुन्हा विजय हजारे स्पर्धेत चॅम्पियन ठरला आहे. 2008 मध्ये हा संघ शेवटच्या वेळी चॅम्पियन झाला होता. सौराष्ट्राच्या शेल्डन जॅक्सनच्या खेळीने महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यावर छाया पडली. सौराष्ट्राने हा सामना आणि विजेतेपद पाच गडी राखून जिंकले.
सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राने 50 षटकांत नऊ गडी गमावून 248 धावा केल्या. ऋतुराजने 108 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात सौराष्ट्रने 46.3 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य गाठले. शेल्डन 136 चेंडूत 133 धावा करून नाबाद राहिला.