Ambani Family Honoured Rohit Sharma, Hardik Pandya and Suryakumar Yadav: अनंत अंबानी याच्या संगीत सोहळ्यात रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांची उपस्थिती; अंबानी कुटुंबाकडून खास शैलीत सन्मान (Watch Video)

लेकाच्या संगीत सोहळ्यात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी  टीम इंडीयाच्या शिलेदारांचे कौतुक करत त्यांच्या दिमाखदार कामगिरीचे कौतुक केले. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांचा अंबानी कुटुंबाकडून खास सन्मान करण्यात आला.

Ambani Family Honoured Rohit Sharma, Hardik Pandya and Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 वल्ड कप जिंकल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी निरवणूक काढण्यात आली. त्यानंतर काल शुक्रवारी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्यकुमार यादव यांचे खास कौतुक केले. टीम इंडियाच्या विजयात त्यांच्या कामगिरीचा मोाचा वाटा असल्याने त्यांचे खास स्टेजवर त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोहळ्यासाठी हजर राहिलेल्या सर्वांचा एकच जल्लोष पहायला मिळाला. (हेही वाचा: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा नातवंडांसोबतचा हृदयस्पर्शी व्हिडीओ; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील खास क्षण (Watch Video))

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now