Rohit vs Hardik: हार्दिक पांड्यावर संतापला रोहित शर्मा; भर मैदानातच ओरडला ( Watch Video )

मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत असतानाच. गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत मुंबईच्या तोंडचा घास पळवला. दरम्यान, रोहित शर्माचा (Rohit Sharma) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Photo Credit -Twitter

Rohit vs Hardik: या व्हिडीओत रोहित हार्दिकवर संतापल्याचं दिसून येत आहे. हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा अनंत अंबानी आणि गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans)गोलंदाज राशिद खानसोबत गप्पा मारताना दिसत आहे. त्याचवेळी हार्दिक पांड्या ( Hardik Pandya ) येतो आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) मिठी मारतो. मात्र, यानंतर रोहित शर्मा हार्दिक पांड्यावर चांगलाच संतापतो. कर्णधार म्हणून तू कोणत्या चुका केल्यात, याबाबत रोहित हार्दिकची कानउघडणी करताना दिसून येत आहे. (हेही वाचा : GT vs MI, IPL 2024 5th Match Live Score Update: मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, नमन धीर 20 धावा करून बाद )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)