IPL 2022 SRH vs RR: राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर 61 धावांनी विजय
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर गोलंदाजांनीही राजस्थानसाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. युझवेंद्र चहलने तीन आणि प्रसिद्ध कृष्णाने दोन बळी घेतले. कर्णधार संजू सॅमसनचे झंझावाती अर्धशतक आणि शिमरॉन हेटमायरच्या धडाकेबाज खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 बाद 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाला निर्धारित षटकांत केवळ 149 धावा करता आल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)