WFI Membership Suspended: ब्रेकिंग! यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व केले निलंबित

भारतीय कुस्तीपटूंना यापुढे आगामी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ध्वजाखाली भाग घेता येणार नाही. समितीने कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला झालेला विलंब हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे.

Brijbhushan Sharan Singh

WFI Membership Suspended: भारतीय कुस्तीसाठी एक वाईट बातमी येत आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. भारतीय कुस्तीपटूंना यापुढे आगामी जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ध्वजाखाली भाग घेता येणार नाही. समितीने कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला झालेला विलंब हे त्याचे प्रमुख कारण ठरले आहे. याआधी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाला निवडणुका वेळेवर न घेण्याचा इशारा दिला होता. भूपेंद्रसिंग बाजवा यांच्या नेतृत्वाखालील तदर्थ समितीने निवडणुका आयोजित करण्यासाठी 45 दिवसांच्या मुदतीचा आदर न केल्यामुळे 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंना 'तटस्थ खेळाडू' म्हणून भाग घ्यावा लागेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now