Tokyo Olympics 2020: ऑलिंपिकमध्ये रौप्य कामगिरीनंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- ‘हे पदक माझ्या देशाला समर्पित’

“हे माझ्यासाठी खरोखर स्वप्नपूर्ती सारखे आहे. मी हे पदक माझ्या देशाला समर्पित करू इच्छिते आणि या प्रवासात माझ्याबरोबर आसलेल्या सर्व भारतीयांच्या अब्ज प्रार्थनांचे आभार मानू इच्छिते,” चानू यांनी लिहिले.

मीराबाई चानू (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियोमध्ये ऐतिहासिक ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू (Meerabai Chanu) यांनी ट्विटरवर भावुक पोस्ट शेअर केली आणि आपले पदक देशासाठी समर्पित केले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या (Weightlifting) इतिहासातील ऑलिम्पिकमधील (Olympics) हे भारताचे दुसरे पदक असून 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पहिले पदक जिंकले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)