Thomas-Uber Cup Semifinals: भारतीय पुरुष संघाने घडवला इतिहास, डेन्मार्क टीमवर 3-2 ने मात करून पहिल्या थॉमस-उबर कप फायनलमध्ये मारली धडक
Thomas-Uber Cup Semifinals: ऐतिहासिक थॉमस कप उपांत्य फेरीत भारताने डेन्मार्कचा 3-2 असा पराभव केल्याने स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. सात्विक-चिराग, किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांच्या विजयी मोहिमेच्या जोरावर भारतीय संघाने इतिहास रचला आणि आता थॉमस चषक 2022 मध्ये किमान रौप्य पदक निश्चित केले आहे.
ऐतिहासिक थॉमस कप (Thomas Cup) उपांत्य फेरीत भारताने (India) डेन्मार्कचा (Denmark) 3-2 असा पराभव केल्याने स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एचएस प्रणॉयने (HS Prannoy) रासमुस गेमकेवर 13-21, 21-9, 21-12 अशी मात करून नाट्यमय पुनरागमन पुनरागमन केले आणि भारतासाठी थॉमस कप उपांत्य फेरी जिंकली. तसेच स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला किमान रौप्य पदक निश्चित झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)