Bajrang Punia Suspended by NADA: ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा निलंबित; 11 जुलैपर्यंत द्यावे लागणार उत्तर

आता निलंबनासोबतच नाडाने बजरंग पुनियाला नोटीसही बजावली आहे. NADA च्या म्हणण्यानुसार, बजरंगने 10 मार्च रोजी सोनीपतमध्ये झालेल्या चाचण्यांदरम्यान त्याच्या लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता.

Bajrang Punia (PC - ANI)

Bajrang Punia Suspended by NADA: भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला (Bajrang Punia) मोठा धक्का बसला आहे. पुनिया यांना राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) पुन्हा तात्पुरते निलंबित केले आहे. गेल्या वेळी जेव्हा NADA ने बजरंगला निलंबित केले होते, तेव्हा त्याला नोटीस न बजावल्यामुळे त्याचे निलंबन शिस्तपालन समितीने मागे घेतले होते. मात्र आता निलंबनासोबतच नाडाने बजरंग पुनियाला नोटीसही बजावली आहे. NADA च्या म्हणण्यानुसार, बजरंगने 10 मार्च रोजी सोनीपतमध्ये झालेल्या चाचण्यांदरम्यान त्याच्या लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

ANI ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement