Khelo India Youth Games 2022: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राची कमाल; 112 पदकांसह अव्वल स्थानावर

वेदांत माधवन याने पंधराशे मीटर फ्री स्टाईल शर्यतीत दुसरे सुवर्णपदक नोंदविताना निर्विवाद यश मिळविले.

खेलो इंडिया यूथ गेम्स (Photo Credit: IANS)

मध्य प्रदेशमध्ये 30 जानेवारीपासून ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ चालू आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केली आहे. सध्या स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. आज खेलो इंडिया युथ गेम्सच्या 10 व्या दिवशी महाराष्ट्राने आठ सुवर्णपदके जिंकली. अशाप्रकारे राज्याने 100 पदकांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या महाराष्ट्राच्या नावावर 112 पदके नोंद आहेत. यामध्ये 39 सुवर्णपदके, 39 रौप्य पदके आणि 34 कांस्य पदकांचा समावेश आहे.

आज खेलोइंडिया मध्ये जलतरणात मुलींच्या 200 मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत अपेक्षा फर्नांडिस हिने दोन सुवर्णपदके, तर वेदांत माधवन याने पंधराशे मीटर फ्री स्टाईल शर्यतीत दुसरे सुवर्णपदक नोंदविताना निर्विवाद यश मिळविले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement