Asian Games 2023: भारताची 41 वर्षांची प्रतीक्षा संपली, एचएस प्रणॉयने भारताला मिळवून दिले ऐतिहासिक पदक
त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
चीनच्या ली शिफेंगने पुन्हा एकदा भारताचे मन मोडले. सांघिक स्पर्धेत श्रीकांतनंतर ली झिफेंगने एकेरीत एचएस प्रणॉयचा पराभव केला. प्रणॉयला उपांत्य फेरीत 21-16, 21-9 असा पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत होऊनही प्रणॉय इतिहास रचण्यात यशस्वी ठरला. प्रणॉयने उपांत्य फेरी गाठल्याने भारताचे पदक निश्चित झाले. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, या कांस्यपदकाने भारताची चार दशकांची प्रतीक्षा संपवली. भारताने 41 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन एकेरीत पदक जिंकले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)