India Beat Japan: भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला, आशिया चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत मारली धडक
भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत माजी विजेत्या जपानचा 3-2 असा पराभव (India Beat Japan) केला आणि प्रथमच या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. यामुळे भारताचे किमान रौप्य पदक निश्चित आहे.
- Read in
- मराठी
Badminton Asia Team Championships 2024: भारताच्या महिला बॅडमिंटन संघाने बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या (Badminton Asia Team Championships 2024) अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास रचला आहे. भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत माजी विजेत्या जपानचा 3-2 असा पराभव (India Beat Japan) केला आणि प्रथमच या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. यामुळे भारताचे किमान रौप्य पदक निश्चित आहे. भारतीय महिला किंवा पुरुष संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघाच्या विजयाची हिरो ठरली ती 17 वर्षीय अनमोल खरब, जिने निर्णायक सामना जिंकला.
HISTORY SCRIPTED 🤩🤩
First-ever final for #TeamIndia at #BATC 🥳
Courtesy: 17 year old Anmol Kharb@himantabiswa | @sanjay091968 | @lakhaniarun1 #BATC2024#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/2LbQSmzqWO
— BAI Media (@BAI_Media) February 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 01:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

