Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ गीता फोगट पतीसोबत जंतरमंतरला जात असताना दिल्ली पोलिसांनी घेतल ताब्यात, ट्वीट करत दु:ख केले व्यक्त
येथून दोघांना बवना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग आणि कुस्तीपटूंमध्ये चुरस सुरु आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू धरणे धरत आहेत. या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी बाहेर पडलेल्या गीता फोगट (Geeta Phogat) आणि तिचे पती पवन सरोहा यांना पोलिसांनी सिंघू सीमेवर ताब्यात घेतले. येथून दोघांना बवना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यापूर्वी गीताने ट्विटरवर लिहिले होते की, मी जंतरमंतरवर जात आहे. विशेष म्हणजे बुधवारी रात्री जंतरमंतरवर झालेल्या गोंधळानंतर कुस्ती शौकिनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बुधवारी रात्री निदर्शने करणाऱ्या कुस्तीपटूंवर दिल्ली पोलिसांनी मारहाण केल्याचा कुस्तीगीरांचा आरोप आहे. या दंगलीत काही पैलवानांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. या घटनेनंतर विनेश फोगटने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकलेली सर्व पदके कुस्तीपटू परत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)