BWF World Tour Finals: पीव्ही सिंधूला पुन्हा विजेतेपदाची पुन्हा हुलकावणी, कोरियन खेळाडूने सहज मात करून दिला पराभवाचा धक्का

भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूला BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदाच्या सामन्यात रविवारी कोरियाच्या अन सेउंगकडून पराभव पत्करावा लागला आहे. गतविजेत्या सिंधूने शनिवारी चुरशीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र 26 वर्षीय भारतीय शटलरला अंतिम सामन्यात सरळ गेममध्ये 16-21 आणि 12-21 असा पराभव पत्करावा लागला.

पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) पुन्हा एकदा अंतिम फेरीत येऊन पुन्हा एकदा विजेते पदापासून वंचित राहावे लागले. रविवारी झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्सच्या विजेतेपदाच्या लढतीत सिंधूचा दक्षिण कोरियाच्या एन सेयुंगने  (AN Seyoung) 21-16, 21-12 असा पराभव केला. सिंधूने ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकले होते मात्र त्यानंतर तिला एकही विजेतेपद जिंकू शकली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now