Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ खेळांसाठी टीम इंडियाचे बॉक्सर्स सज्ज; अमित पंघाल, शिवा थापासह 8 खेळाडूंचा बॉक्सिंग संघात समावेश

Commonwealth Games 2022: जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता अमित पंघाल आणि शिव थापा यांनी गुरुवारी पटियाला येथे झालेल्या चाचण्यांनंतर राष्ट्रकुल क्रीडा 2022 साठी भारताच्या पुरुष बॉक्सिंग संघात स्थान निश्चित केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिलांच्या बॉक्सिंग चाचण्या पुढील आठवड्यात होणार आहेत.

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ खेळांसाठी टीम इंडियाचे बॉक्सर्स सज्ज; अमित पंघाल, शिवा थापासह 8 खेळाडूंचा बॉक्सिंग संघात समावेश
बॉक्सिंग ग्लोव्हज (Photo Credit: Pixabay)

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (Boxing Federation) गुरुवारी, 2 जून रोजी पतियाला येथे झालेल्या टेस्टनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष संघाची घोषणा केली. जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेते अमित पंघाल (Amit Panghal) आणि शिव थापा (Shiva Thapa) यांनी 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम (Birmingham) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी 8 खेळाडूंच्या संघात स्थान मिळवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2022 08:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).