MI vs DC: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथला संधी मिळाली आहे. ट्रिस्टन स्टब्सला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या संघात 2 बदल करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज रिले मेरेडिथला संधी मिळाली आहे. ट्रिस्टन स्टब्सला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

त्याचबरोबर टीम डेव्हिडच्या जागी नेहल वढेराला संघात स्थान देण्यात आले आहे. दिल्ली संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. यश धुलला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. खलील अहमदला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. रिले रुसोच्या जागी मुस्तफिजुर रहमानला संधी मिळाली आहे. हेही वाचा IPL 2023: कुटुंब कर्जात बुडाले होते, पण आता संघर्षाचे दिवस संपले आहेत, KKR स्टार रिंकू सिंगची प्रतिक्रिया