MI W vs DC W: दिल्ली कॅपिटल्सकडून मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव

110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला स्फोटक सुरुवात करून सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला आणि पहिल्या विकेटसाठी 56 धावांची शानदार भागीदारी केली.

Delhi Capitals Woman

महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या आवृत्तीतील 18 वा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स महिला संघाने मुंबई इंडियन्स विरुद्धचा सामना 9 गडी राखून जिंकला आणि गुणतालिकेत पहिले स्थानही मिळवले. 110 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार मेग लॅनिंग आणि शेफाली वर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाला स्फोटक सुरुवात करून सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला आणि पहिल्या विकेटसाठी 56 धावांची शानदार भागीदारी केली. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून फलंदाजीत अत्यंत खराब कामगिरी झाली आणि संघाला 20 षटकात 8 विकेट गमावून केवळ 109 धावा करता आल्या. हेही वाचा GG W vs UP W: गुजरात जायंट्सला पराभवाची धुळ चारत यूपी वॉरियर्सची प्लेऑफमध्ये धडक

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now