LSG VS MI, IPL 2024 Toss Update: लखनऊने जिंकली नाणेफेक, मुंबईला दिले फलंदाजीसाठी आमंत्रण
लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत 4 सामने झाले आहेत. त्यातील तीन सामने लखनौने तर एक सामना मुंबईने जिंकला आहे. मुंबईनं
आयपीएल 2024 च्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे. लखनौच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत आहे. लखनै सध्या गुणातालिकेत 10 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्स 9 पैकी 3 सामने जिंकून नवव्या स्थानावर आहेत. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्सचा प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
पाहा पोस्ट -