IND vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा चार विकेट्सनं पराभव, मालिकेत 2-0 घेतली आघाडी

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं दक्षिण आफ्रिकेच्या टॉपच्या तीन फलंदाजाला माघारी धाडून सामना टीम इंडियाच्या बाजुनं झुकवला. परंतु, हेनरिक क्लासेननं तुफानी फलंदाजी करत भारताच्या आशेवर पाणी सोडलं. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव ठरलाय.

Photo Credit - Social Media

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा सहा विकेट राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजेने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 18.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 81 धावा केल्या. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा टी-20 सामना 14 जून रोजी विशाखापट्टणम येथील एसीए स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement