AUS W vs SA W T20 WC Final: ICC महिला T20 विश्वचषक 2023 चे विजेतेपद ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या नावावर

या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 156 धावा केल्या, ज्यामध्ये बेथ मुनीने नाबाद 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 6 बाद 137 धावाच करू शकला.

ICC महिला T20 विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाचा 19 धावांनी पराभव केला आणि 6व्यांदा T20 ट्रॉफी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 156 धावा केल्या, ज्यामध्ये बेथ मुनीने नाबाद 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 6 बाद 137 धावाच करू शकला. त्याचवेळी, या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गार्डनरने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now