‘मी पुढच्या आठवड्यापासून बेरोजगार असणार, कोणती ऑफर आहे का?’, T20 World Cup 2024 च्या विजयानंतर Rahul Dravid ची विनोदी प्रतिक्रीया (Watch Video)

ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजेतेपदाच्या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत असताना, प्रशिक्षक राहुल द्रविड याने प्रशिक्षक पद सोडत असल्याची आठवण करुन देत विनोदी प्रतिक्रीया दिली आहे.

Rahul Dravid on Leaving Coach Position: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने एकही सामना न गमावता आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 जिंकला(ICC T20 World Cup 2024 Winner). भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपल नाव कोरले आहे. राहुल द्रविड याने निकालाची पर्वा न करता विश्वचषकानंतर पद रिक्त करण्याची इच्छा आधीच व्यक्त केली होती. पण या विजयाने खूश होऊन राहुल द्रविडने(Rahul Dravid) आपली विनोदी बाजू दाखवली आहे. त्याने लोकांना त्याच्या निर्णयाची आठवण करून देत ‘मी पुढच्या आठवड्यापासून बेरोजगार असणार, कोणती ऑफर आहे का?’ असे म्हटले आहे. त्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा:PM Modi Special Thanks Rahul Dravid: 'अतुलनीय कोचिंग कौशल्यामुळे यशाला आकार मिळाला'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहूल द्रविडचे कौतुक, एक्सवर पोस्ट शेअर)

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)