Pakistan Vs England 2nd Test: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा विजय, मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी
रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला.
17 वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशीच दणदणीत विजय मिळवला आहे. मुलतान येथे झालेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. यासह त्याने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला होता आणि आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही पाकिस्तानचा पराभव केला. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांचे लक्ष्य दिले होते. पाकिस्तानचा संघ केवळ 328 धावांवर गडगडला. हेही वाचा IndW vs AusW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकरांनी भारतीय महिला क्रिकेट संघाशी साधला संवाद
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)