Women's World Cup 2022: दक्षिण आफ्रिकेला हरवून इंग्लंड फायनलमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होणार अंतिम लढाई
अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 293 धावा केल्या.
महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 293 धावा केल्या. इंग्लंडकडून सलामीवीर डॅनियल वॉटने 125 धावांची आकर्षक खेळी खेळली. या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 38 षटकांत 156 धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून सोफी अॅलेक्सटनने जबरदस्त गोलंदाजी करताना 38 धावांत 6 बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)