Amy Jones and Piepa Cleary Engagement: एमी जोन्स आणि पिपा क्लीरी यांनी उरकली इंगेजमेंट; क्रीडा जगतात थक्क करणारी घटना

एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून चियर्स टू एव्हर असे कॅप्शन लिहिले आहे.

Photo Credit - Instagram

Amy Jones and Piepa Cleary Engagement: इंग्लंडची क्रिकेटपटू एमी जोन्स (Amy Jones)हिने ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर पिपा क्लीरी( Piepa Cleary)सोबत इंगेजमेंट केल्याची घोषणा केली आहे. एमी जोन्सने इंस्टाग्रामवर क्लीरीसोबतचा फोटो पोस्टकरून चियर्स टू एव्हर असे कॅप्शन लिहिले आहे. एंगेजमेंटच्या फोटोत क्लीरीच्या बोटात हिऱ्याची अंगठी दिसतेय. या दोघी बऱ्याच काळापासून डेटिंग करत होत्या. एमी जोन्स इंग्लंडची यष्टीरक्षक आहे. तर, पिपा क्लीरी ऑस्ट्रेलियाची गोलंदाज आहे. महिला बिग बॅग लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सकडून खेळत असताना दोघींची भेट झाली होती. (हेही वाचा: खेळाडूंना षटकार मारण्यावर बंदी, सिक्स मारल्यास फलंदाज होणार बाद, इंग्लंडच्या क्रिकेट क्लबचा अजब निर्णय)

पोस्ट पहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Amy Jones (@amyjones313)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif