GT vs DC: दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

रिले रुसोचे दिल्ली संघात पुनरागमन झाले असून खलील अहमदही संघात आला आहे. गुजरातने संघात कोणताही बदल केलेला नाही.

DC vs GT (Photo Credit - Twitter)

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिचेल मार्शला दिल्ली संघातून बाहेर जावे लागले आहे.मार्श दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये. रिले रुसोचे दिल्ली संघात पुनरागमन झाले असून खलील अहमदही संघात आला आहे. गुजरातने संघात कोणताही बदल केलेला नाही.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीपर), मनीष पांडे, रिले रुसो, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, रिपल पटेल, अमन हकीम खान, कुलदीप यादव, एनरिक नोरखिया, इशांत शर्मा.

गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोश लिटल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement