Yuvraj Singh Blessed with Second Baby: युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीचला कन्यारत्न; माजी क्रिकेटर दुसऱ्यांदा झाला पिता (See Photo)
टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग दुसऱ्यांदा पिता बनला आहे. क्रिकेटचा सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजच्या घरात एका मुलीचा जन्म झाला आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज खेळाडूने दुसऱ्यांदा बाप झाल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने पत्नी हेजल कीचसोबत मुलगा आणि मुलगी दोघांचा फोटो शेअर केला आहे. राजकन्येच्या घरी येण्याने कुटुंब पूर्ण झाल्यामुळे तो किती आनंदी आहे हे त्याने सांगितले. फोटो शेअर करत युवराज सिंहने लिहिले की, ‘जेव्हापासून छोटी राजकुमारी आमच्या घरी आली आहे, तेव्हापासून रात्री जागण्याची मजा आणखीनच मजेदार झाली आहे. हा अनुभव वेगळा आहे आणि आता कुटुंब पूर्ण झालेले दिसते.’ (हेही वाचा: Asia Cup 2023 Prize Money: बुधवारपासून सुरू होणार आशिया चषक, विजेत्या आणि उपविजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊस; वाचा सविस्तर)