Nathan Smith Catch Video: असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! किवी खेळाडू बनला मैदानावर सुपरमॅन, क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक सगळेच अचंबित
किवी संघाने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 142 धावांवर गारद झाला. कामिंडू मेंडिसने संघाकडून सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. गोलंदाजीसोबतच न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट होते.
New Zealand National Cricket Team vs Sri Lanka National Cricket Team 2nd ODI 2025: न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 113 धावांनी पराभव केला. किवी संघाने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 142 धावांवर गारद झाला. कामिंडू मेंडिसने संघाकडून सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. गोलंदाजीसोबतच न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट होते. संघाच्या वतीने नॅथन स्मिथने (Nathan Smith) डावाच्या 29व्या षटकात असा झेल घेतला, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्मिथने मधल्या मैदानावर एखाद्या सुपरमॅनप्रमाणे हवेत उडी मारली आणि डायव्हिंग करताना शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नॅथन स्मिथने घेतला शानदार झेल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)