Yeh barish bhi Ambani ne karwaya kya ab? चिन्नास्वामीवर झालेल्या पावसामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर
जर आरसीबी विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा मुंबईच्या संघाला होईल आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचेल. आता पाऊस पाहताच सोशल मीडियावर फनी मीम्सचा पूर आला आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा शेवटचा साखळी सामना आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium, Bangalore) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात होणार आहे. पण, यावेळी बंगळुरूचे हवामान पाहता या सामन्यात पावसाने हजेरी लावली आहे. जर आरसीबी विरुद्ध गुजरात सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा मुंबईच्या संघाला होईल आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचेल. आता पाऊस पाहताच सोशल मीडियावर फनी मीम्सचा पूर आला आहे. 'देवालाही आरसीबीला प्लेऑफमध्ये बघायचे नाही' असे चाहते म्हणत आहेत. तसेत हा पाऊस अंबानीने पाडला आहे असे म्हणत आहे.
पहा मीम्सचा पूर