Yashasvi Jaiswal Century: षटाकर ठोकत यशस्वी जैस्वालने भारतात झळकावले पहिले कसोटी शतक, खास शैलीत केले सेलिब्रेशन (Watch Video)

जयस्वालने 151 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. या सामन्याच्या पहिल्या डावात जैस्वाल सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जयस्वालच्या फलंदाजीत खूप आत्मविश्वास दिसत होता. यशस्वीने इंग्लिश गोलंदाजांना आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही.

Yashasvi Jaiswal Century: षटाकर ठोकत यशस्वी जैस्वालने भारतात झळकावले पहिले कसोटी शतक, खास शैलीत केले सेलिब्रेशन (Watch Video)

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना (IND vs EG 2nd Test) विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. जयस्वालने 151 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. या सामन्याच्या पहिल्या डावात जैस्वाल सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जयस्वालच्या फलंदाजीत खूप आत्मविश्वास दिसत होता. यशस्वीने इंग्लिश गोलंदाजांना आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही. यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडपून काढले. यशस्वी फलंदाजी करताना दिसला. यशस्वी जैस्वालचे हे भारतीय भूमीवरील कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक आहे. तर त्याचे कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे. जैस्वाल यांनी वेस्ट इंडिजच्या भूमीवर कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 02, 2024 02:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).