Yashasvi Jaiswal Century: यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील झळकावले तिसरे शतक, भारताने 290+ धावांची आघाडी केली पार
IND vs ENG 3rd Test Day 3: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना (IND vs ENG 3rd Test) खेळला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळण्यासाठी उतरले आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 35 षटकांत दोन गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाला 130.5 षटकात 445 धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. दरम्यान, पहिल्या डावात इंग्लडंचा संघ 319 धावावर गारद झाला आहे. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 153 धावांची खेळी खेळली. भारतकडून सिरजने 4 विकेट आणि कुलदीपने - जडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील हे त्याचे दुसरे शतक आहे. त्याने दुसऱ्या म्हणजे शेवटच्या कसोटीत द्विशतक झळकावले होते. त्याने 122 चेंडूत शतक झळकावले. यशस्वी टी-20 मोडमध्ये फलंदाजी करत आहे.
Double-century in Vizag
💯 & counting in Rajkot!
Yashasvi Jaiswal in tremendous touch ✨#TeamIndia | #INDvENG | @ybj_19 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ajBA4uJSHk
— BCCI (@BCCI) February 17, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

