World Cup Final: 'प्रत्येकवेळी केवळ एकाच शहरात फायनल आयोजित केली जाऊ शकत नाही'; Aaditya Thackeray यांच्या खोचक टीकेला BCCI चे प्रत्युत्तर

या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईऐवजी अहमदाबाद येथे आयोजित केले होता. आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर बीसीसीआयने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Aaditya Thackeray

World Cup Final: भारतीय क्रिकेट संघाने 2013 पासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. जवळजवळ 17 वर्षे भारताला टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र अखेर भारताने टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय संघासाठी बीसीसीआयने मुंबईत विजयी परेडचे आयोजन केले होते. या परेडनंतर आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी एक पोस्ट केली, टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे मुंबईत भव्य स्वागत, हा बीसीसीआयसाठी, देशाच्या आर्थिक राजधानीतून कोणत्याही मोठ्या स्पर्धेचा अंतिम सामना कधीही हिरावून न घेण्याचा संदेश आहे. ठाकरेंनी आयसीसी विश्वचषक अंतिम सामन्याबाबत बीसीसीआयवर निशाणा साधला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईऐवजी अहमदाबाद येथे आयोजित केले होता. आदित्य ठाकरेंच्या या टीकेनंतर बीसीसीआयने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणतात, ‘काल विजयी टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या मुंबईकरांचे मी आभार मानतो. विश्वचषक फायनल कुठे घ्यायची हा निव्वळ रोटेशनल विषय आहे. प्रत्येकवेळी केवळ एकाच शहरात फायनल आयोजित केली जाऊ शकत नाही. याआधी मुंबई, कोलकात्यानेही फायनल आयोजित केल्या आहेत. त्याचप्रमाणे अहमदाबादच्या मैदानाची क्षमताही 1.30 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ती फायानक तिथे आयोजित केली. तुम्ही एका ठिकाणी मर्यादित राहू शकत नाही. पण अर्थातच मुंबईकरांचा प्रतिसाद पाहून आम्हाला खूप आनंद झाला. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि मुंबई नेहमीच आमच्या प्राधान्यक्रमाच्या यादीत असते. पण सामना केवळ एकाच शहरात व्हायला हवा असे म्हणणे योग्य नाही.’ (हेही वाचा: राज्य सरकारकडून रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा सत्कार, टीम इंडियाला मिळाले 'इतके' कोटी रुपयांचे बक्षीस)

पहा पोस्ट-