Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलिया खेळाडूंनी दंडावर बांधली काळी पट्टी, दिग्गज Shane Warne आणि Rod Marsh यांच्या स्मरणार्थ पाळले मौन (Watch Video)

ऑस्ट्रेलिया क्रिकेटने काही तासांच्या अंतरात एकाच दिवशी आपले दोन दिग्गज खेळाडू गमावले. माजी यष्टिरक्षक रॉड मार्श यांचे शुक्रवारी निधन झाल्यावर ‘फिरकीचा जादूगार’ शेन वॉर्न याच्या धक्कादायक निधनाने संपूर्ण क्रिके विश्वात शोककळा पसरली. यानंतर आयसीसी महिला विश्वचषक 2022 चा पहिला सामना खेळण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने एक मिनिट मौन पाळून वॉर्न आणि मार्श यांना श्रद्धांजली वाहिली.

ऑस्ट्रेलियन खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात (Photo Credit: Twitter)

फिरकीचा ‘जादूगार’ शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियाने एकाच दिवशी आपले दोन दिग्गज खेळाडू गमावले. माजी यष्टिरक्षक रॉड मार्श  (Rod Marsh) यांचेही शुक्रवारी निधन झाले. आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 च्या सामन्यात मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियन संघाने (Australia Team) एक मिनिट मौन पाळून शेन वॉर्न आणि मार्श यांना श्रद्धांजली वाहिली. ऑस्ट्रेलियन संघ दंडावर दोन काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement