Women's T20 Challenge: 16 धावांनी पराभूत होऊनही Velocity फायनलसाठी पात्र, ट्रेलब्लेझर्सची विजयासह मोहीम संपुष्टात; किरण नवगिरेने ठोकले जलद अर्धशतक

Women's T20 Challenge 2022: ट्रेलब्लेझर्स संघाने वेलोसिटीचा 16 धावांनी पराभव केला. वेलोसिटीने 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावा केल्या. पराभवानंतरही त्याने अंतिम फेरीत धडक मारली. वेलोसिटीच्या विजयात किरण नवगिरेने (Kiran Navgire) महत्वपूर्व भूमिका बजावली. तिने 25 चेंडूत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले. आता 28 मे रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत त्यांचा सामना सुपरनोव्हाशी होईल.

ट्रेलब्लेझर्स (Photo Credit: Twitter/IPL)

VEL vs TBL, WT20 Challenge 2022: वेलोसिटीने (Velocity) महिला टी-20 चॅलेंजच्या (Women's T20 Challenge) अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने (Trailblazers) गुरुवारी वेलोसिटीचा 16 धावांनी पराभव करूनही त्यांना स्पर्धेतून बाहेर पाडावे लागले आहे. पुण्यातील MCA स्टेडियमवरील सामन्यात ट्रेलब्लेझर्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 190 धावा केल्या, प्रत्युत्तरात वेलोसिटी संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 174 धावाच करू शकला. पण नेट रनरेटच्या जोरावर त्यांनी फायनलमध्ये धडक मारली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now