Bhuvneshwar Kumar Changed Instagram Bio: भुवनेश्वर कुमार लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून होणार निवृत्त? इंस्टाग्राम बायोमधून 'क्रिकेटर' शब्द काढून टाकला
भुवनेश्वरने जानेवारी 2022 मध्ये पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जिथे त्याला 8 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. तेव्हापासून दुखापती आणि खराब फॉर्ममुळे तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आहे.
Bhuvneshwar Kumar भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे किंवा तो लवकरच घेईल. खरं तर, 33 वर्षीय भुवनेश्वर कुमारने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्राम बायोमधून क्रिकेटर हा शब्द काढून टाकला आहे. भुवनेश्वरच्या इन्स्टा बायोमध्ये आधी 'भारतीय क्रिकेटर' असे लिहिले होते पण आता ते काढुन टाकले आहे. भुवनेश्वरने जानेवारी 2022 मध्ये पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जिथे त्याला 8 ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. तेव्हापासून दुखापती आणि खराब फॉर्ममुळे तो एकदिवसीय संघातून बाहेर पडला आहे. त्याच वेळी, भुवनेश्वर देखील नोव्हेंबर 2022 मध्ये टी-20 विश्वचषक संघाचा एक भाग होता, जिथे त्याने चार सामने खेळले आणि तीन विकेट घेतल्या.