WI vs SA 1st Test: लुंगी एनगीडीचा ‘पंच’, पहिल्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज 97 धावांवर ढेर; दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीत नाणेफेक जिकून फलंदाजी करणारा लुंगी एनगीडीने विंडीज संघाला पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 97 धावांवर गुंडाळले. माजी कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकी संघासाठी लुंगी एनगीडीने 19 धावांवर पाच विकेट्स घेतल्या.

लुंगी एनगीडी (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीत नाणेफेक जिकून फलंदाजी करणारा लुंगी एनगीडीने (Lungi Ngidi) विंडीज संघाला पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 97 धावांवर गुंडाळले. माजी कर्णधार जेसन होल्डरने (Jason Holder) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकी संघासाठी लुंगी एनगीडीने 19 धावांवर पाच विकेट्स घेतल्या तर एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) 35 धावा देत चार गडी बाद केले. यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिका संघाने 128/4 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement