भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकला वेस्ट इंडिजचा खेळाडू Marlon Samuels, आयसीसीने दिला हा मोठा निर्णय

निवृत्त कॅरेबियन खेळाडूला टी-20 सामन्यादरम्यान आयसीसीने चार भ्रष्टाचार विरोधी कोड काउंटमध्ये दोषी ठरवले होते. आता जवळपास दोन वर्षांनंतर सॅम्युअल्सला त्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाला दोन वेळा विश्वविजेता बनवणाऱ्या मार्लन सॅम्युअल्सचे (Marlon Samuels) आयुष्य संकटात सापडले आहे. स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने केलेल्या खटल्यानंतर तो भ्रष्टाचार प्रतिबंधक संहितेअंतर्गत चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. निवृत्त कॅरेबियन खेळाडूला टी-20 सामन्यादरम्यान आयसीसीने चार भ्रष्टाचार विरोधी कोड काउंटमध्ये दोषी ठरवले होते. आता जवळपास दोन वर्षांनंतर सॅम्युअल्सला त्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 'शिक्षेबाबत निर्णय घेण्यापूर्वी पंचाट आता प्रत्येक बाजूचा युक्तिवाद विचारात घेईल. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. सॅम्युअल्सने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 71 कसोटी, 207 एकदिवसीय आणि 67 टी-20 सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 11,134 धावा केल्या आणि 152 बळी घेतले. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement