IND vs WI 1st Test Day 1 Live Score Update: वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, यशस्वी आणि ईशानचे पदार्पण
टीम इंडिया 13 वर्षांनंतर डॉमिनिकामध्ये कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर 2011 मध्ये अखेरचा सामना अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाला आतापर्यंत येथे फक्त एकच सामना खेळता आला आहे.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळला जात आहे. या सामन्यासोबतच टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलही सुरू होत आहे. टीम इंडिया 13 वर्षांनंतर डॉमिनिकामध्ये कसोटी सामना खेळणार आहे. या मैदानावर 2011 मध्ये अखेरचा सामना अनिर्णित राहिला होता. टीम इंडियाला आतापर्यंत येथे फक्त एकच सामना खेळता आला आहे. टीम इंडियाची ही दुसरी कसोटी आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
वेस्ट इंडिज: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), तेजनारिन चंदरपॉल, रेमन रेफर, जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), अॅलिक अटान्झे, जोशुआ डी सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॉरिसेन.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.