West Indies Cricket Team Central Contract: वेस्ट इंडिजने सेंट्रल कॉन्ट्रैक्ट केला जाहीर, निकोलस पूरनसह 3 खेळाडूंनी ऑफर नाकारली
वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर तसेच काईल मेयर्स यांनी ऑफर केलेला करार नाकारला आहे, परंतु हे तिन्ही खेळाडू करार कालावधीत T20I सामने खेळण्यास पात्र आहेत.
West Indies Cricket: क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने 2023-24 साठी केंद्रीय करार मिळालेल्या खेळाडूंची नावे उघड केली आहेत. पुरुष संघातील 14 तर महिला संघातील 15 खेळाडूंना करारबद्ध करण्यात आले. तथापि, वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार निकोलस पूरन, जेसन होल्डर तसेच काईल मेयर्स यांनी ऑफर केलेला करार नाकारला आहे, परंतु हे तिन्ही खेळाडू करार कालावधीत T20I सामने खेळण्यास पात्र आहेत. वेस्ट इंडिज संघासाठी उपलब्ध असतील. निवड समितीच्या शिफारशी आणि संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर 2022 ते 2023 या कालावधीतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर करार देण्यात आले आहेत. वेस्ट इंडिजच्या पुरुष संघाच्या चार खेळाडूंना प्रथमच केंद्रीय करार मिळाला आहे, ज्यात डावखुरा फिरकीपटू गुडाकेश मोती, उजव्या हाताचा फलंदाज केसी कार्टी, डावखुरा फलंदाज तेजनारिन चंद्रपॉल आणि अॅलिक अथान्झे यांचा समावेश आहे. महिला संघाच्या अष्टपैलू खेळाडू झायडा जेम्स आणि शेनेटा ग्रिमंड यांनाही प्रथमच केंद्रीय करार मिळाला आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)